Agriculture News | निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा पाऊस झाल्याने अकोला जिल्हा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी हदबल झाला आहे. बळीराजाला अशा परिस्थितीमध्ये धीर देणे महत्त्वाचे आहे.
मान्सून नंतर झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला होता. बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मदत जाहीर झाले आहे. दोन लाख 46 हजार 188 शेतकऱ्यांसाठी 332 कोटी 96 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेले आहे. वाढीव दरांसह मदत मंजूर झाली आहे.
नोव्हेंबर महिन्याचा शेवटी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी शेती कशी करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. जिल्ह्यामध्ये कापूस आणि तुरी उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. गारपिटीमुळे तुरीच्या आणि कापसाचे पीक मातीमुळे झाले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 207 कोटी 52 लाख 64 हजार 810 रुपयांचा निधी मागणी शासनाकडे करण्यात आले होते नंतर शासनाने हेक्टरी मर्यादा वाढवल्याने त्यानुसार नवा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे महसूल विभागाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. एसडीआरफच्या निकषानुसार यादी दोन हेक्टरच्या मर्यादित मदत दिली जात होती. शासनाने हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये ऐवजी तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी हेक्टरी 17000 रुपयांना ऐवजी 27 हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान बर्फासाठी 22 हजार 50 रुपये ऐवजी 36 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
गत वर्षापासून शासनामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात साठी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणे आवश्यक आहे. तसेच स्तरावरून कार्यवाही करण्यात येणार आहे.
1 thought on “शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13,500 नुकसान भरपाई, यादीमध्ये तुमचे नाव आहे का?”