Agricultural Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आगामी काळात निवडणुकीची लाट येत आहे. होणाऱ्या इलेक्शनचा प्रभाव शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या बाजारभावातील वाढीवर दिसून येत आहे. शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडी बदल माहिती आपण जाणून घेणार आहोत.
- सोयाबीन:
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनच्या बाजारभावात मोठी नरमाई आली आहे. सोयाबीनचा भाव 11.37 डॉलर प्रति प्रति बुशेल्सवर जाऊन पोहोचला होता. तर सोयापेंड 340 डॉलरवर होती. देशातील बाजार समितीमध्ये आजचे भाव 4750 ते 4900 रुपये दरम्यान होते.
देशातील बाजार समितीमधील भाव पातळी 4300 ते 4600 रुपयांच्या दरम्यान होती. म्हणजे या ठिकाणी निवडणुकीच्या प्रभावी प्रवीणच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. देशातील बाजारात पुढील काही आठवडे सोयाबीन बाजारभावात असाच चढ-उतार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन नियम, रेशनकार्डचे अनेक नवीन फायदे सहज कसे मिळवायचे?
- कापूस:
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई अली आहे. स्थलांतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भाव 90 सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होत आहे. तर देशातील बाजार भाव 57 हजार 500 रुपये प्रति क्विंटल वर आले होते. बाजार समितीमध्ये ही कापसाच्या भावातील घसरल सुरूच आहे. Agricultural Market Price
देशातील बाजारात कापसाला आजही सरासरी 7300 ते 7600रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. कापसाचे उत्पादन घटल्यामुळे दर 10 हजाराच्या पार जातील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा मात्र कापसाचे दर अपेक्षेप्रमाणे वाढले नाहीत. कापूस बाजारात आजुन काही दिवस असाच चढ उतार पहायला मिळेल आशा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांची चिंता वाढणारी बातमी..! गॅस सिलिंडर झाला महाग, पाहा नवीन दर
- तुर:
या हंगामात शेतकऱ्याला परवडेल असा हमीभाव फक्त तुरीलाच मिळाला आहे. तुरीच्या भावातील तेजी अजून देखील कायम आहे. वाढती मागणी आणि घटलेली आवक याचा तुरीच्या दरावर मोठा परिणाम दिसून येत आहे. देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी दर 11000 रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान आला होता.
तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव 10000 ते 11000 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. बाजारातील घटती आवक आणि चांगली मागणी यामुळेच तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली आहे. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! निवडणुकीपूर्वी आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचा बाजार भाव
- गहू
देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या चांगले टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातच उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर याचाच प्रभाव म्हणून बाजारामध्ये मागील महिन्याभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले गेले आहेत.
उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतरही सुधारणा दिसून आली. देशभरात सध्या गावाला प्रतिक्विंटल सरासरी 2300 ते 2800 रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखीन काही आठवडे टिकून राहू शकतात. किंवा यात वाट देखील होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
या शेतकऱ्यांचे ₹ 1 लाख रुयांपर्यंतचे कर्ज माफ झाले, नवीन यादीत तुमचे नाव पहा
- कांदा
कांद्याचा भाव वरील दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक कमी असूनही बाजारभावात वाढ झालेली दिसत नाही. सरकारची निर्यात बंदी आणि सरकारच्या इतर धोरणाचा दबाव कांद्यावर स्पष्ट दिसत आहे. चालू वर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झालेल्या असून देखील कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही.
कांद्याची परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या कांदा 1000 ते 1400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकत आहे. देशातील कांदा उत्पादन देखील यंदा घटले आहे. मात्र कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, येणाऱ्या काळात कांद्याचे दर नक्कीच वाढतील असा अंदाज कांदा बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
1 thought on “निवडणुकीपूर्वी शेतीमालाच्या बाजार भावात वाढ..! पहा आजचा कापूस, गहू, सोयाबीन, कांदा तसेच तुरीचा बाजारभाव”