Aayushman Bharat scheme: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. अशातच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य ही योजना राबवलेली असून, या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना दवाखान्यात 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार करून देण्यासाठी सरकारने ही योजना राबवलेली आहे. तर चला तर मग जाणून घेऊया, या योजनेबद्दल. व या योजनेचा कोणत्या नागरिकांना लाभ भेटणार आहे.Aayushman Bharat scheme:
ई-केवायसी न केल्यामुळे आता रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या KYC बद्दल, व कसे चेक करायचे ?
आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य या योजना आता एकत्रितपणे राबवल्या जात असून, त्यामध्ये प्रत्येक कुटुंबांमधील रुग्णास 1,356 आजारांवर मोफत उपचार करून देण्याची संधी आहे. नवजात शिष्यापासून ते वयोवृद्धांपर्यंत या योजनेची संधी भेटणार आहे. व रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी प्रमाणे 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय हा हाती घेतला आहे.
ई-केवायसी न केल्यामुळे आता रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या KYC बद्दल, व कसे चेक करायचे ?
महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावे, या हेतूने आयुष्यमान भारत या योजनेचा निर्णय हा झालेला आहे. व महाराष्ट्र सरकारने गतवर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत या योजना एकत्रित राबवण्याचा निर्णय देखील घेतला आहे. सरकारी नोकरदारापासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत या सर्वांना ही योजना लागू आहे. केशरी, पिवळे अशा रेशन कार्डधारक असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा या आयुष्यमान भारत योजनेतून लाभ मिळवू शकतो.
ई-केवायसी न केल्यामुळे आता रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या KYC बद्दल, व कसे चेक करायचे ?
सध्या तर महाराष्ट्रातील 52 रुग्णालयामध्ये या योजनेमधून मोफत 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार मिळतो. व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील संबंधित रुग्णाने गावातील ऑनलाइन सेवा केंद्र मधून आयुष्यमान भारत कार्ड काढून घेणे अत्यावश्यक आहे. व दुसरीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयातील सोलापूर जिल्ह्यातील खाटांची क्षमता 360 पर्यंत असतानाही रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्या ठिकाणी 365 दिवसांमधील किमान 300 दिवस तरी 1 हजाराहून जास्त रुग्ण मोफत उपचार घेत असतात. सर्व उपचार रुग्णालयाच्या जोडीला 100 खाट महिला व बाल रुग्णालयात तर 100 घाटांचे सर्व उपचार जिल्हा रुग्णालयात देखील केले जात आहेत. व त्यामधून त्यांचे कोट्यावधी रुपयांची बचत होत असल्याची स्थिती ही आपल्याला दिसत आहे.
ई-केवायसी न केल्यामुळे आता रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या KYC बद्दल, व कसे चेक करायचे ?
शासकीय आरोग्ये केंद्रे
- प्राथमिक आरोग्य केंद्रे, 82
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, 431
- ग्रामीण रुग्णालय, 12
- उपजिल्हा रुग्णालय,3
- सर्वापचार रुग्णालय,1
- जिल्हा रुग्णालय,1
20 लाखापेक्षा अधिक रुग्णांची मोफत सेवा ही दरवर्षी केली जाते.
प्रत्येक जिल्ह्यातील 82 गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तर 431 गावांमध्ये उपकेंद्र आहेत. आणि 12 आपले दवाखाने सुद्धा आहेत. त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रोगाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांना प्रत्येक आजारावरील औषध ही मोफत दिली जात आहे. याशिवाय पुढील उपचाराची गरज असल्यास त्यांना संदभसेवा देखील दिली जाते. दरवर्षी 20 लाखांपेक्षा जास्त लोक या सरकारी उपकेंद्रा मध्ये प्राथमिक उपचाराचा लाभ घेतात.