Tips and tricks to chiled water: नमस्कार मित्रांनो, आता चैत्र महिना हा लागलेला आहे. आणि या चैत्र महिन्यामध्ये खूपच कडाक्याचे ऊन पडत आहे. आणि या अशा कडक उन्हामध्ये थंडगार पाणी प्यावे असे वाटत असेल, तर यासाठी तुम्हाला एक खास ट्रिक करावा लागणार आहे. तर काय आहे ते खास ट्रेक तर जाणून घेऊया.
या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नेहमीच थंड पाणी प्यावे असे वाटत असते. पण तब्येतीच्या समस्यामुळे बरेच लोक हे या फ्रिज मधील पाणी पिण्याचे टाळतात. कारण, की यामुळे अनेक प्रकारचे नुकसान हे होऊ शकतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या माठातलं पाणी हमखासपणे पेऊ शकता. पण या माठातलं पाणी हे गरम असेल, तर ते सुद्धा पिण्याची इच्छाही होत नसते. यामुळे माठातलं पाणी हे फ्रीजच्या पाण्यासारखं थंडगार करण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धतीच्या ट्रिक्स वापरू शकतात. या माठातलं पाणी पिल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. व आरोग्याच्या सुद्धा समस्यांपासून आरामही भेटतो.
हे पण वाचा, जाणून घ्या; कोणत्या जिल्ह्याचा पाणीसाठा किती टक्के शिल्लक राहिलेला आहे..!
शरीराच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी हे पाणी पिण्यासाठी सुरुवात करा. कारण की मातीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात की ज्यामुळे या आजारांपासून लढण्यासाठी मदत ही होत असते. इतकेच नाही, तर यामधून भेटणारे मिनरल्स हे आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त तुम्हाला माठातलं पाणी हे प्यायचं असेल, तर तुम्ही काही सोपे उपाय करून हे पाणी थंड ठेवू शकतात.Tips and tricks to chiled water:
तर, या सोप्या ट्रिक्स वापरा
माठामधील पाणी हे थंडगार राहण्यासाठी सगळ्यात आधी रेती घ्या. व रेती नसेल तर तुम्ही माती सुद्धा घेऊ शकतात. आणि मग नंतर रेती ओली करून एक प्लेट किंवा वाटी ठेवा. यावर तुम्ही या मातीचा माठ ठेवणार आहात, व त्यानंतर माठ हा स्वच्छ पाण्याने धुऊन काढा. आणि नंतर माठ स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर रात्रभरासाठी माठ तसाच ठेवून द्या.
माठ हा बाहेरून ओला करा यातील पार्सल मध्ये पाणी जाईल याची खात्री करा. ज्यामुळे माठाच्या आतलं पाणी हे थंडगार राहील दुसऱ्या दिवशी ते पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्या व नंतर स्वच्छ करून पुन्हा भरून घ्या. सकाळी ही प्रक्रिया पुन्हा करा, पाणी भरल्यानंतर त्यात सौंधव मीठ घाला. सात ते आठ तास तसंच ठेवून द्या. व त्यानंतर नियमित दिवसातून एक ते दोन वेळा गरजेनुसार पाणी भरा या उपायाने माठातलं पाणी थंड राहण्यासाठी मदत होईल.
ओला कपडा घेऊन माठ हा गुंडाळा
माठामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. संपूर्ण माठाभोवती सुती कापडाने गुंडाळून ठेवा. ज्यामुळे पाणी हे थंड राहण्यासाठी मदत ही होईल, व दिवसांमधून एक ते दोन वेळा सुती कापड भिजवून माताभोवती गुंडाळून ठेवावे. त्यामुळे माठातले पाणी हे थंडगार राहील. आणि जास्तीत जास्त बारा ते अठरा तास ठेवले तर पाणी हे थंड गार होईल.
1 thought on “उन्हाळ्यामध्ये माठातलं पाणी लवकर गार होण्यासाठी करा एक खास ट्रिक; यामुळे फ्रिज सारखं गार पाणी होईल..!”