या योजनेअंतर्गत मिळणार मोफत गॅस सिलेंडर…! कोणती आहे योजना.?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder Price : होळी हा सण भारतामध्ये अति उत्साहाने साजरा केला जातो या सणा निमित्त सरकारकडून मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सध्या उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश मध्ये 1.75 कोटी पात्र एलपीजी गॅस धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरची वाटप केले जाणार आहे. उज्वला योजनेचे लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी वर्षातून दोन वेळा मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहे. यादी उत्तर प्रदेश सरकारने या योजनेचे प्रथम गॅस सिलेंडर दिवाळी या सणाला दिले आहे.LPG Cylinder Price

कोणाला मिळणार या योजनेचा फायदा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे अनिवार्य आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांनी 2016 मध्ये उज्वला योजना अंतर्गत केला होता. त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारने पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत अनेक कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला होता.

व आता या योजनेअंतर्गत 23 24 या वर्षासाठी 2312 कोटी रुपयांची बजेट घोषित केले आहे. त्यामध्ये उज्वला योजना अंतर्गत १.७५ कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन वेळेस मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयाची घसरण :

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीआधी ८ मार्च म्हणजे महिला दिवसाचा महिलांना आकर्षक भेटवस्तू म्हणून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 100 रुपयाची घट केल्याची घोषणा केली आहे. आता घरगुती गॅस ची किंमत 800 रुपये इतकी झाली आहे. चेन्नईमध्ये 818 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये 803 रुपये इतकी घरगुती गॅसची किंमत आहे.

हे पण वाचा :- या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर! वाचा सविस्तर माहिती

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “या योजनेअंतर्गत मिळणार मोफत गॅस सिलेंडर…! कोणती आहे योजना.?”

Leave a Comment