Sorghum Market : मागील काही दिवसापासून ज्वारीची आवक घटत आहे. शनिवारी 14 हजार क्विंटल ज्वारीची आवक आहे. परंतु काल सोमवारी 5000 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. ज्वारीला सरासरी 2000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामध्ये मालदंडी ज्वारी वाणाला सर्वाधिक दर मिळत आहे.
आज च्या बाजार दर अहवालानुसार राज्यातील बाजार समिती मध्ये जवळपास 6000 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. बाजार समितीमध्ये दादर ,हायब्रीड ,मालदांडी ,पांढरी ,शालू, अशा ज्वारीची आवक आहे. सर्वाधिक 18 क्विंटल ची आवक चाळीसगाव बाजार समितीमध्ये पांढऱ्या ज्वारीची झाली आहे. याचबरोबर जळगाव बाजार समितीमध्ये दादर ज्वारीची सर्वाधिक आवक झाली आहे. Sorghum Market
सर्वाधिक ज्वारीला दर हे 5,000 पन्नास रुपयांचा भाव पुणे बाजार समितीमध्ये मालदंड या ज्वारीच्या वाणाला मिळाला आहे. परंतु यात मात्र दोनशे रुपयाची घसरण झाली आहे, याचबरोबर मंगळवेढा बाजार समितीत तीन हजार आठशे रुपयांचा बाजार भाव ज्वारी ला मिळाला आहे. तर सर्वात कमी 1700 रुपये बाजार भाव ज्वारीला परतुर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.
या जिल्ह्यामध्ये ज्वारीची झाली सर्वाधिक आवक :
तज्ञांची माहितीनुसार आज जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची आवक पाहायला मिळाली आहे. या बाजार समितीमध्ये ज्वारीला 2200 रुपये दर मिळाला आहे, तरी पांढरी ज्वारीची आवक 1800 क्विंटल झाली आहे. हायब्रीड ज्वारीची 132 क्विंटल आवक झाली आहे. दादर ज्वारीची 770 क्विंटन झाली असून या ज्वारीला 2738 रुपये दर मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक भाव हे मालदंडी ज्वारीला मिळाला आहे.