Weather Today: महाराष्ट्र प्रमाणे इतर राज्यात मध्येही आता पाच दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशातच महाराष्ट्र राज्यामध्ये वातावरणात दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहे. व काही राज्यांमध्ये अलर्ट हा जारी केला आहे. तर कोणत्या राज्यांमध्ये हा अलर्ट जारी केला आहे. व महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, ती आपण यामध्ये जाणून घेऊया.
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण देशातील हवामानामध्ये मोठा बदल हा दिसत आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानामध्ये कसल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण बदल होण्याचा अंदाज आयएमडीने यामध्ये व्यक्त केलेला आहे.
हे पण वाचा, राज्यातील या शेतकऱ्यांना भेटणार नाही पीएम किसानचा 16 वा हप्ता, पहा यादीत तुमचे नाव…!
या हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बनसचा परिणाम होण्याची शक्यता ही आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये अनेक भागात या पावसाची हजेरी पाहायला भेटणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 25 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशांमध्ये तुरळक आणि वेगळ्या हलक्या प्रकारचा पाऊस व हिमवृष्टीची शक्यता आहे. आणि तसेच महाराष्ट्र राज्यामध्येही पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये या पावसाची शक्यता.
या भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा ईशारा हा जारी करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडीसा व झारखंड या राज्यांमध्ये सुद्धा या पावसाचा अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. याच दरम्यान केरळ राज्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार 26 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बालिस्तान, मुझफराबाद आणि 26 व 27 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये गडगडाट व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस व हिमवृष्ठीचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. Weather Today
महाराष्ट्र राज्य मध्ये हवामान हे कसं असेल ?
उत्तरेमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे पुन्हा एकदा सर्वत्र ठिकाणी तापमान घसरल्याचे चित्र हे पाहायला भेटत आहे. परभणी मध्ये शनिवारी 11.4 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आलेले आहे. मागच्या तीन दिवसांपासून परभणीचे तापमान हे 13 अंशाखाली गेलेले होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असून दुपारी तापमानामध्ये वाढ ही झालेली आहे.
तर सकाळी आणि संध्याकाळी थंडी व दुपारच्या वेळेत गर्मी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे विविध आजार ही पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अजून दोन ते तीन दिवस हे तापमान कमीच राहणार असल्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्रज्ञाने विभागाद्वारे वर्तवली आहे.
मागील काही दिवसांपासून पुणेकरांना चांगल्याच उन्हाळ्याच्या झळा या बसत होत्या. भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुणे येथील किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता ही वर्तवली आहे. मुंबई व ठाण्यातही किमान तापमानामध्ये किंचित घट होईल, पण मात्र हवामानामध्ये जास्त बदल होण्याची शक्यता नाही.
महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता.
महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील पाच दिवस म्हणजे 29 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण विदर्भामध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यातही 25 ते 27 फेब्रुवारी पर्यंत तीन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता ही आहे. पावसाबरोबर गारपीट होण्याचाही अंदाज विभागाने वर्तवला आहे.
नागपूरसह, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती अशा या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही जास्त असेल, असा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेले पिकांचे योग्य नियोजन करावे. असा इशारा विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी ही लावलेली होती, पण त्यामुळे बहुतेक भागातील रब्बीची पिके व भाजीपाला आणि तसेच संत्रा-मोसंबीच्या बहाराला फटका फार बसलेला होता.
1 thought on “राज्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता, ‘या’ राज्यांमध्येही केला अलर्ट जारी…!”