19 kg gas cylinder price today: आज फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आहे, व फेब्रुवारी महिन्याचा पहिल्याच दिवस आणि अर्थसंकल्पाचा देखील आज दिवस आहे यातच आता महागाईचा मारा सर्वसामान्यांना होणार आहे.1 फेब्रुवारी आज एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
तेल विपणन कंपनीने आज एक फेब्रुवारीपासून एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. 19 किलोच्या व्यवसाय सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 14 किलोच्या एलपीजी घरगुती स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या दरात कोणतीही बदल झाली नाहीत.
तेल कंपन्यांनी सिलेंडरचे नवीन दर जारी केले. नवीन दरानुसार,1 फेब्रुवारीपासून व्यवसायिक गॅसच्या दरात 14 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 30.50 रुपये केंद्र सरकारने कपात केली होती. जानेवारी महिन्यात देखील व्यवसाय गॅसचे दर 2 रुपयांनी कमी करण्यात आले होते. मात्र आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच व्यवसायिक गॅस हा महागला आहे.
प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक 19 किलो गॅस सिलेंडरचे दर/19 kg gas cylinder price today :
दिल्लीमध्ये व्यावसायिक 1769 रुपये आहे , कोलकत्ता मध्ये 1887 रुपये, चेन्नईत 1723 रुपये, तर मुंबईमध्ये व्यवसायिक सिलेंडरचा दर 1723.50 रुपये इतका झाला आहे. या वाढत्या भावामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडर मध्ये कोणताही बदल झालेला नाही.
14 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे दर:
मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 902.50 इतका आहे, तर राजधानी दिल्लीमध्ये 14 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची दर 903 रुपये आहेत, कोलकत्ता मध्ये घरेलू गॅस सिलेंडर 929 रुपये आहे. चेन्नईत 918.50 रुपये इतके दर 14 किलो एलपीजी सिलेंडरचे आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट द्वारे नक्की कळवा.