1 kg red Chili price: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की, लाल मिरची ही चटणी व मसाला बनवण्यासाठी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येत आहे. व तसेच या मिरचीचे पीक शेतकरी जास्त प्रमाणावर काढत असतात. आता याच मिरचीच्या भावामध्ये घट झालेली ही दिसून येत आहे. तर जाणून घ्या या लाल मिरची बद्दल.
आता ऋतू हा बदललेला आहे म्हणजेच उन्हाळा सुरू झाला की घरातील महिला या लालमिरचीचा, मसाला तयार करण्यासाठी उपयोग करत असतात. पण यावर्षी दिवाळीपासूनच या लाल मिरचीचा ठसका हा वाढलेला होता.
पण, सुक्या मसाल्यासाठी या वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे भाव हे गाव बाजारामध्ये 400 ते 500 रुपये किलो प्रमाणे झालेले आहेत.
हे पण वाचा: सोन्या चांदीच्या दरात मोठा बदल; पहा आजचे भाव
आणि तसेच या मिरचीचे भाव हे किलोमागे 50 रुपयांनी कमी झालेले आहे. आणि या मिरचीच्या भावामध्ये काही ठिकाणी बदल हा झालेला नाही. तर आपल्या मराठवाड्यामध्ये या मिरचीच्या भावामध्ये बदल झालेला दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे, या गाव बाजारामध्ये लाल मिरचीचा ठसका हा आता उतरणीला लागलेला आहे. वाशी मधील या बाजारामध्ये सध्या लाल मिरची ही मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या मिरचीची आवक ही फार वाढलेली आहे. आता 14 ते 15 या गाड्या सध्या मिरचीच्या बाजारामध्ये रोज आवक करत आहेत.
डहाणू मधील मिरची बागायतदार हे संकटात !
आता हळूहळू या गाड्यांची संख्या ही वाढू लागलेली आहे. मुख्य हंगामामध्ये 80 ते 90 गाड्या ह्या दाखल होत आहेत. एका गाडीमध्ये 4 ते 5 हजार गोण्या भरून मिरची दाखल होते.
या मिरच्यांच्या गोणीचे वजन हे 30 ते 35 किलो एवढे असते. तसेच फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना म्हणून ओळखला जातो. यामुळे या काळात बाजारामध्ये लाल मिरचीचा ठसका हा जास्तच लागलेला आहे.1 kg red Chili price:
या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे फार नुकसान झाले.
मागील वर्षी या अवकाळी पावसामुळे या मिरची पिकाला चांगल्याच मोठा फटका बसलेला होता. पण, त्यातच अनेक ठिकाणी गोदाम असलेली लाल मिरची ही पाण्याखाली गेल्याने फार मोठे नुकसान सुद्धा झाले होते.
बाजारामध्ये या लाल मिरचीचे भाव वाढण्यास सुरुवात झालेली होती.
आता या महिन्यामध्ये आवक वाढल्याने मिरचीचे भाव सुद्धा कमी होत आहेत. पण, घाऊक बाजारामध्ये लाल मिरचीच्या भावात किलोमागे 50 ते 100 रुपयांची घट ही झालेली दिसून येत आहे. तर घाऊकबाजारामध्ये भाव उतरल्याने किरकोळ बाजारामध्येही भाव उतरलेला लागलेले दिसून येत आहेत.